क्रीडा : स्नूकर

By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:22+5:302014-08-25T21:40:22+5:30

भारताला आशियाई स्नूकरचे अजिंक्यपद

Sports: Snooker | क्रीडा : स्नूकर

क्रीडा : स्नूकर

रताला आशियाई स्नूकरचे अजिंक्यपद
नवी दिल्ली : कमल चावला, फैसल खान आणि धर्मेंद्र लिली यांचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेम फायनलमध्ये ३-१ ने धूळ चारून आशियाई स्नूकर टीम चॅम्पियनशिपचा किताब आपल्या नावे केला़
माजी आयबीएफएफ विश्व स्नूकर चॅम्पियन मोहंमद आसिफ आणि माजी आशियाई स्नूकर चॅम्पियन मोहंमद सज्जाद भारताच्या चावला आणि फैसल यांचा मुकाबला करू शकले नाहीत़ त्याआधी भारतीय टीमने उपांत्य फेरीच्या लढतीत इराणवर ३-१ अशी मात करीत फायनलमध्ये प्रवेश केला होता़
चावला, फैसल आणि धर्मेंद्र यांचा हा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय किताब आहे़ फैसलने मोहंमद आसिफला ८१ चा ब्रेक लगावताना १०६-०० अशी धूळ चारली़ चावलाने सज्जादवर ९१-६ ने सरशी साधली,तर चावला आणि धर्मेंद्रची जोडी आसिफ आणि सज्जादकडून ८३-६७ ने पराभूत झाली; मात्र फैसलने सज्जादवर ५० ब्रेकच्या जोरावर ८३-४३ ने विजय मिळवीत भारताला किताब मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Snooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.