क्रीडा : सायना
By Admin | Updated: September 2, 2014 19:35 IST2014-09-02T19:35:30+5:302014-09-02T19:35:30+5:30
विमल कुमार सायनाचे नवे प्रशिक्षक

क्रीडा : सायना
व मल कुमार सायनाचे नवे प्रशिक्षक गोपीचंदशी नाते तोडले : खराब फ ॉर्ममुळे घेतला निर्णयहैदराबाद : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बाहेर होणारी भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिने राष्ट्रीय प्रशिक्षक पी़ गोपीचंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे़ तिने आता नवे प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला आहे़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले गोपीचंद आणि सायना हे वेगळे होणार आहे़ सायना गेल्या काही दिवसांपासून खराब फ ॉर्मशी झगडत आहे़ नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतही तिला विशेष खेळ करता आला नव्हता़ तेव्हाच सायना आणि गोपीचंद वेगवेगळे होणार हे स्पष्ट झाले होते़ २४ वर्षीय सायना हिने गत आठवड्यात डेन्मार्कमध्ये गोपीचंदला याबद्दल माहिती दिली होती़ यावर गोपीचंदनेही सहमती दर्शविली होती़ सतत खराब फॉर्म आणि मोठ्या स्पर्धेतील पराभव यामुळेच सायनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे़ पी़ गोपीचंद हे पी़व्ही़ सिंधू आणि पी़ कश्यप यांनाही मार्गदर्शन करतात. त्यामुळे सायनासाठी ते आपला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते़ त्यामुळे सायना हिने आशियाई स्पर्धेपूर्वी माजी भारतीय प्रशिक्षक विमल कुमार यांच्यासोबत सराव करण्याचा निर्णय घेतला आहे़ सायना म्हणाला, मी आता विमल कुमार यांच्यासोबत सराव करणार आहे़ उबेर चषकादरम्यान त्यांची मला बरीच मदत झाली होती़ मी गोपीचंद यांनाही या संदर्भात कळविले आहे़ त्यांची कोणतीही अडचण नाही़ विशेष म्हणजे सायना गोपीचंदपासून पहिल्यांदाच वेगळी झालेली नाही़ यापूर्वी २०११ मध्येही सायनाने गोपीचंदऐवजी भास्कर बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला होता़ मात्र, तीन महिन्यांनंतर पुन्हा सायनाने गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखालील सरावास सुरुवात केली होती़ (वृत्तसंस्था)