स्पोर्ट पेज: बुलडाणा: २६ धावांची आघाडी खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२०१४

By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:03+5:302014-09-26T21:40:03+5:30

अकोला: पावसामुळे स्थगित करण्यात आलेली खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा २०१४ मधील उर्वरित सामन्यांना २६ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. यवतमाळ व बुलडाणा जिल्हा संघात आज, शुक्रवारी सुरू झालेल्या सामन्यामध्ये बुलडाणा जिल्हा संघाने २६ धावांची आघाडी घेतली आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सामने खेळविण्यात येत आहे.

Sports page: Buldhana: 26 runs lead Khairagad Cup cricket tournament- 2014 | स्पोर्ट पेज: बुलडाणा: २६ धावांची आघाडी खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२०१४

स्पोर्ट पेज: बुलडाणा: २६ धावांची आघाडी खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२०१४

ोला: पावसामुळे स्थगित करण्यात आलेली खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा २०१४ मधील उर्वरित सामन्यांना २६ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. यवतमाळ व बुलडाणा जिल्हा संघात आज, शुक्रवारी सुरू झालेल्या सामन्यामध्ये बुलडाणा जिल्हा संघाने २६ धावांची आघाडी घेतली आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सामने खेळविण्यात येत आहे.
नाणेफेक जिंकून यवतमाळ संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात यवतमाळ संघाने ४९.१ षटकात सर्व बाद १९० धावा काढल्या. स्नेहल कमानकर याने अर्धशतक झळकाविले. स्नेहलच्या नाबाद ५० आणि प्रणय शेंद्रे याच्या ३८ धावांच्या जोरावर यवतमाळने १९० धावा काढल्या. अन्य खेळाडूंनी फारशी कामगिरी दाखविली नाही. बुलडाणाच्या ऋषिकेश पवार याने यवतमाळचे ५ गडी पटापटा बाद केल्याने यवतमाळने डाव लवकर गुंडाळला. मोईन शेख याने ३ गडी बाद केले. रामेश्वर सोनुने, शुभम पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
बुलडाणा संघाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात दमदार केली. सलामीचे फलंदाज सुशील वानखडे याच्या ३५ आणि आनंद सुर्वेच्या ५४ धावांनी मैदानात जल्लोष झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या प्रमोद वाघ याने ६८ धावा काढून बुलडाणा संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावत नेला. अन्य खेळाडू फारवेळ खेळप˜ीवर तग धरू शकले नाही. बुलडाणा संघाने ४० षटकात ९ बाद २१६ धावा काढून २६ धावांची आघाडी घेतली. यवतमाळच्या अक्षय करनेवार व आकाश कडू यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. आशीष राठी याने २ आणि स्नेहल कमानकर याने १ गडी टिपला. सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबाद व राजेश भोसले यांनी काम पाहिले. गुणलेखन अभिजित मोरेकर यांनी केले. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामन्यांचे आयोजन केले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sports page: Buldhana: 26 runs lead Khairagad Cup cricket tournament- 2014

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.