नवी दिल्ली : क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शनिवारी फुटबॉलची जागतिक संघटना फिफाच्या अधिका:यांची भेट घेतली आणि भारताच्या यजमानपदाखाली 2017 मध्ये होणा:या 17 वर्षाखालील वर्ल्डकपच्या तयारीच्या प्रगतीविषयी चर्चा केली.
भारतीय क्रीडा प्राधिकरणने त्यांच्या निवेदनात म्हटले, 2017 मध्ये होणा:या अंडर 17 फिफा वर्ल्डकपच्या दृष्टिकोनातून स्टेडियमची पाहणीस आलेल्या फिफा अधिका:यांची सोनोवाल यांनी नेहरु स्टेडियममध्ये भेट घेतली. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. या संदर्भात त्यांनी संक्षिप्त चर्चा केली. सोनोवाल यांनी मंत्रलयाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आणि नंतर ते अधिका:यांसोबत विस्तृत चर्चा करणार आहेत. त्याआधी सोनोवाल यांनी स्टेडियममध्ये नेत्रहीनांसाठी आयोजित 19 व्या आयबीएसए राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. चार दिवस चालणा:या या स्पर्धेत देशभरातील 60 पेक्षा अधिक संघ सहभागी झाले आहेत. नेत्रहीन खेळाडूंसाठी ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा असून ती प्रत्येक 2 वर्षात एकदा होते. (वृत्तसंस्था)