क्रीडा लोकल जोड
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:29+5:302015-10-03T00:20:29+5:30
राज्य शालेय बॉस्केटबॉल स्पर्धा

क्रीडा लोकल जोड
र ज्य शालेय बॉस्केटबॉल स्पर्धाआठ विभागाच्या संघांचा सहभागनागपूर : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेला उद्या, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत आठ विभागीय स्पर्धेतील विजेते संघ सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी दिली.तीन दिवस १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलामुलींच्या गटात होणाऱ्या स्पर्धेतील सामने शिवाजीनगर जिमखाना आणि अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बास्केटबॉल कोर्टवर होणार आहेत. स्पर्धेत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई, नाशिक व कोल्हापूर या विभागातील संघ सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी अंतिम सामने होणार असून सायंकाळी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणी होणार आहे. स्पर्धेसाठी शिवाजीनगर जिमखानाचे दोन आणि रातुम नागपूर विद्यापीठाचे दोन कोर्ट सज्ज आहेत. स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींमध्ये त्रिमूर्तीनगर येथील भवन्स स्कूल, मुलांमध्ये काटोल रोड येथील सेंटर पॉईंट स्कूल, १७ वर्षांखालील मुलामुलींमध्ये काटोल रोड येथील सेंटर पॉईंट स्कूल आणि १९ वर्षांखालील मुलींमध्ये एलएडी महाविद्यालय व मुलांमध्ये सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूल नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शिवाजीनगर जिमखानाच्या मैदानावर रविवारी ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अध्यक्षा खासदार पुनम महाजन उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही विजय संतान यांनी दिली. पत्रकार परिषदेला नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले, प्रणय घाटे, समीर श्रीवास्तव उपस्थित होते.--------------------------------