क्रीडा लोकल
By Admin | Updated: July 4, 2014 22:42 IST2014-07-04T22:42:45+5:302014-07-04T22:42:45+5:30
भगिनी मंडळ बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

क्रीडा लोकल
भ िनी मंडळ बॅडमिंटन स्पर्धा आजपासूननागपूर : भगिनी मंडळ सब-ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या यंदाच्या मोसमाला या स्पर्धेने सुरुवात होणार आहे. या तीन दिवसीय स्पर्धेतील लढती सिव्हिल लाईन्सस्थित वायएमसीए रॉबर्ट्सन सभागृहात रंगणार आहेत. जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत मुलामुलींच्या विभागात १०, १३ आणि १५ वर्षांखालील गटातील सामने होतील. (क्रीडा प्रतिनिधी)मानांकन यादी : अंडर - १० (मुले-एकेरी) :- १) सिद्धांत बावनकर, २) मिहित पटेल. अंडर - १० मुली (एकेरी) :- १) निकिता जोसेफ, २) कृपी साजवान. अंडर-१३ (मुले-एकेरी) :- १) रोहन गुरबानी, २) सुधांशु भुरे. मुली :- १) आर्या अंचलवार, २) लिव्हिआ फर्नांडिज. अंडर - १३ (मुले-दुहेरी) :- १) रोहन गुरबानी-सुधांशु भुरे, २) राजेश देव-कानद येरपुडे. मुली :-१) आर्या अंचलवार-लिव्हिआ फर्नांडिज, २) साई जामदार-सारा पांडे. अंडर-१५ (मुले-एकेरी) :- १) रोहन गुरबानी, २) समरजित पांडे. मुली :- १) मालविका बन्सोड, २) श्रिया अरोरा. मुले (दुहेरी) :- १)रोहन गुरबानी-सुधांशु भुरे, २) रितिक बोबडे- सिद्धांत पराते. मुली :- १) आर्या अंचलवार-लिव्हिआ फर्नांडिज, २) साई जामदार-सारा पांडे.