क्रीडा : जीतू राज

By Admin | Updated: July 1, 2014 21:43 IST2014-07-01T21:43:33+5:302014-07-01T21:43:33+5:30

जीतू राय एअर पिस्टल मानांकनात नंबर वन

Sports: Jitu Raj | क्रीडा : जीतू राज

क्रीडा : जीतू राज

तू राय एअर पिस्टल मानांकनात नंबर वन
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारताच्या जीतू रायने एअर पिस्टलच्या जागतिक मानांकनात अव्वल क्रमांकावर ताबा मिळविला आहे़
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) दिलेल्या माहितीनुसार नेमबाजीची जागतिक संस्था आयएसएसएफने विविध स्पर्धांतील नेमबाजांची जागतिक रॅकिंग जारी केली आहे़ त्यात जीतू राय एअर पिस्टलमध्ये नंबर वन ठरला आहे़
अशी कामगिरी करणारा राय भारताचा सातवा नेमबाज ठरला आहे़ यापूर्वी अंजली भागवत, राज्यवर्धनसिंह राठोड, गगन नारंग, मानवजित सिंह, रंजन सोढी, हीना सिद्धू, यांनी आपापल्या स्पर्धांमध्ये जागतिक मानांकनात नंबर वनचा ताज मिळविला होता़
एनआरएआयचे अध्यक्ष रणिंदर सिंह यांनी जीतू रायच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे़ रॉयने जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर झेप घेतल्यामुळे भारताचे नाव उंचावले आहे़ यापुढेही त्याने आपली प्रभावी कामगिरी पुढे सुरूच ठेवावी, असेही ते म्हणाले़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Jitu Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.