शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

क्रीडा विभाग आॅनलाईन होणार

By admin | Published: August 09, 2016 3:41 AM

खेळाडूंच्या सोयीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबई विभाग (मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर) लवकरच सर्व प्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने करणार आहे

मुंबई : खेळाडूंच्या सोयीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबई विभाग (मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर) लवकरच सर्व प्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने करणार आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरावरील खेळाडूंपर्यंत पोहचण्यासाठी क्रीडा विभाग सोशल मीडीयाचा प्रभावी वापर करणार आहे.स्वतंत्र क्रीडा धोरण असलेले देशातील पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे क्रीडा धोरणांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आॅनलाईनचा आधार घेणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे मुंबई विभागातील पाच जिल्हा विभागांच्या सर्व स्पर्धांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार असून लवकरच क्रीडा व युवक संचालनालयाचे अद्यायावत संकेतस्थळ तयार होणार आहे. यावर स्पर्धेविषयी सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल. त्याचबरोबर खेळाडूंच्या प्रवेशिका आॅनलाईन पध्दतीने स्वीकारणार आहे. प्रवेशिका स्वीकारल्यानंतर खेळाडूंना ओळखपत्र देण्यात येणार असून काही अनिवार्य कारणांमुळे स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आल्यास त्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमाने देणार आहे.युवा खेळाडूंपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्याच भाषेचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना ‘टेक्नोसॅव्ही’ होण्याचे फर्मान धाडण्यात आले. शिवाय मुंबई विभाग फेसबूक, टिष्ट्वटर व व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमाने सर्व स्पर्धा आयोजक, शिक्षक आणि खेळाडंूशी संपर्कात राहणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)