क्रीडा : बोल्ट

By Admin | Updated: September 2, 2014 19:35 IST2014-09-02T19:35:12+5:302014-09-02T19:35:12+5:30

ॲथलेटिक्सला क्रिकेटप्रमाणे आकर्षक बनवायला हवे -बोल्ट :

Sports: Bolt | क्रीडा : बोल्ट

क्रीडा : बोल्ट

लेटिक्सला क्रिकेटप्रमाणे आकर्षक बनवायला हवे -बोल्ट :
बंगळुरू : भारतात ॲथलेटिक्सला क्रिकेटप्रमाणे आकर्षक बनवायला हवे, असे मत जमैकाचा वेगवान धावपटू युसेन बोल्ट याने व्यक्त केले आहे़ यामुळे या खेळाकडे अधिकाधिक युवा खेळाडू आकर्षित होतील, असेही मत बोल्ट याने व्यक्त केले आहे़
स्वत: क्रिकेटवेडा असलेला आणि आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक, तसेच चार वेळा विश्व विजेता किताब मिळविणारा बोल्ट एम़ चिन्नस्वामी क्रिकेट स्टेडियमवर आयोजित एक मैत्रीय सामना खेळण्यासाठी शहरात आला आहे़ तो या लढतीत भारताचा अनुभवी फलंदाज युवराज सिंह आणि ऑफ स्पिनर हरभजनसिंह यांच्याविरु द्ध सामना खेळणार आहे़
बोल्ट म्हणाला, या देशात क्रिकेटबद्दल विशेष प्रेम आहे़ या खेळात देशाच्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे़ मात्र, आमच्या देशात ॲथलेटिक्स हा खेळ लोकप्रिय आहे़ याच खेळात आमचे खेळाडू करिअर करण्यासाठी प्रयत्नशील असतात़ आमच्या येथे शालेय स्तरावरील ॲथलेटिक्सला विशेष महत्त्व दिले जाते़ या स्तरावरून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतात, असेही त्याने सांगितले़
बोल्टने आपल्या यशाचे श्रेय हे फिटनेस आणि कठोर परिश्रमाला दिले़ तो म्हणाला, सोमवार ते शुक्रवार रोजी ६़३० तास सराव करतो़ याच बळावर मी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदके मिळविली आहेत़ यापुढेही देशासाठी अशीच कामगिरी करण्याची इच्छा आहे़
हा अनुभवी धावपटू पुढे म्हणाला, मला क्रिकेटबद्दलही विशेष आवड आहे़ माझ्यासाठी जमैकाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविणे खुप अवघड काम होते़ त्यामुळे वडिलांनी भविष्याचा विचार करता मला ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला होता़ तो सल्ला खरोबरच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Bolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.