क्रीडा भारती पुरस्कार
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:30+5:302015-01-30T21:11:30+5:30
खेळाडूंच्या मातांचा गौरव होणार

क्रीडा भारती पुरस्कार
ख ळाडूंच्या मातांचा गौरव होणारक्रीडा भारतीचा उपक्रम: जिजामाता पुरस्कार देणारनागपूर : मैदानावर चमकदार कामगिरी करणाऱ्या संत्रानगरीतील खेळाडूंच्या मातांना या खेळाडूंच्या उपस्थितीत वीरमाता जिजाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. क्रीडा भारतीतर्फे १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मेडिकल चौकातील पंं. बच्छराज व्यास विद्यालयात हा कार्यक्रम होईल.क्रीडा भारतीच्या विदर्भ प्रांताचे प्रमुख प्रसन्न हरदास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की ४० मातांचा कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन आणि खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन केंद्रीय रस्ते वाहतूक तसेच जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते गौरविण्यात येईल. यावेळी क्रीडा भारतीचे विदर्भ अध्यक्ष एचव्हीपीएम अमरावतीचे डॉ. विजय वैद्य, रवींद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी महानगर संघचालक राजेश लोया हे राहतील.२०१४-१५ या सत्रात राज्य, राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावर पहिल्या तीन क्रमांकावर राहणाऱ्या विविध खेळातील खेळाडूंच्या मातांना गौरविणार असल्याची माहिती उपाध्यक्ष डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. क्रीडा भारतीद्वारे दरवर्षी सूर्यनमस्कारसह पाच क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जात असल्याचे हरदास यांनी सांगितले.पत्रपरिषदेला क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष संजय लोखंडे, सचिव दिलीप भांदककर, योगप्रमुख डॉ. संजय खळतकर, बबन बढिये, अर्जुन पुरस्कारप्राप्त विजय मुनिश्वर, सुधीर पुसदकर, दत्ता पाचखेडे, विलास पाध्ये आणि सुरेश देशपांडे उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)....................