क्रीडा : अजिंक्य रहाणे

By Admin | Updated: September 1, 2014 20:00 IST2014-09-01T20:00:36+5:302014-09-01T20:00:36+5:30

धवन, विराटचा रहाणेकडून बचाव

Sports: Ajinkya Rahane | क्रीडा : अजिंक्य रहाणे

क्रीडा : अजिंक्य रहाणे

न, विराटचा रहाणेकडून बचाव
नॉटिंघम : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि वन-डे मालिकेत निराशाजनक कामगिरी करणार्‍या विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे़ मात्र, भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे याने या दोन्ही खेळाडूंचा बचाव केला आहे़ हे खेळाडू लवकरच फॉर्ममध्ये परततील, असेही त्याने म्हटले आहे़
रहाणे म्हणाला, धवन सध्या फॉर्ममध्ये येत आहे़ विशेष म्हणजे वन-डेत अनेक खेळाडू चांगला फटका मारूनही बाद होतात़ तिसर्‍या सामन्यातही तो ज्या प्रकारे फटका मारून बाद झाला़ तो फटका चुकीचा नव्हता़ त्याने मारलेला चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला़ या लढतीत धवन याने १६ धावा केल्या होत्या़ धवन याने ३ कसोटींत एकूण १२७ धावा केल्या होत्या, तर दोन वन-डेत त्याला केवळ २७ धावांच करता आल्या आहेत़
दुसरीकडे विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे़ तो दुसर्‍या वन-डे शून्यावर बाद झाला, तर तिसर्‍या वन-डे त्याने ४० धावा केल्या होत्या़ रहाणे याने पुढे सांगितले की, तो भारताचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे़ तो चांगले खेळूनही लवकर बाद होत आहे़ त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी केवळ एका मोठ्या खेळीची गरज आहे़ त्यानंतर तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडेल, असेही रहाणे याने म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Ajinkya Rahane