स्पोर्ट: यश, आकाश, परमेश्वर, दीपिका, पायल, सोनू अव्वल जिल्हा स्तर शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा
By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:14+5:302014-08-27T21:30:14+5:30
अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवार, २६ ऑगस्ट रोजी १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात लढती झाल्या. यामध्ये ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील शालेय किक बॉक्सिंगपटू सहभागी झाले होते.

स्पोर्ट: यश, आकाश, परमेश्वर, दीपिका, पायल, सोनू अव्वल जिल्हा स्तर शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा
अ ोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवार, २६ ऑगस्ट रोजी १७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात लढती झाल्या. यामध्ये ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील शालेय किक बॉक्सिंगपटू सहभागी झाले होते.स्पर्धेत विविध वजनगटात यश पिंजरकर, कृष्णकांत खुपसे, शुभम वाघमारे, प्रभजन अवताडे, चेतन चव्हाण, शुभम चव्हाण, आकाश तेलंग, मनोज बांगर, वैभव गवई, परमेश्वर शिंदे, दिनेश चव्हाण, अरविंद सावन, सय्यद शोएबउद्दीन, मोहम्मद तनवीर, राजेश बावणे, खान तारीक वकार, शेख शहबाज शेख सईद, मो.नदीम, दीपिका तायडे, भारती लव्हाळे, ऐश्वर्या धेवळे, नेहा वाघमारे, गौरी गोपनारायण, पायल केवट, मारूफा अनम, नेहा केवट, स्विटी केवट, सीमा थोरात, नीलिमा सिरसाट, सोनू वानखडे, ओम ढोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांची निवड वाशिम येथे होणार्या विभागीय स्तर स्पर्धेसाठी झाली आहे. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून सेन्साई अरुण सारवान यांनी काम पाहिले. त्यांना पंच खुशबू चोपडे, शहजाद खान, प्रीती रिछारिया, पूजा काळे, शिवानी कवाने यांनी सहकार्य केले. (क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: स्पर्धेत खेळप्रदर्शन करताना किक बॉक्सिंगपटू.-२८सीटीसीएल०७...