स्पोर्ट पेज: विभागीय कुस्ती स्पर्धेत अकोल्याचे नऊ मल्ल विजयी
By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:09+5:302014-09-26T21:40:09+5:30
अकोला: हनुमान प्रसारक व्यायाम शाळा अमरावती येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत अकोल्याच्या नऊ मल्लांनी विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.

स्पोर्ट पेज: विभागीय कुस्ती स्पर्धेत अकोल्याचे नऊ मल्ल विजयी
अ ोला: हनुमान प्रसारक व्यायाम शाळा अमरावती येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत अकोल्याच्या नऊ मल्लांनी विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन २४ व २५ सप्टेंबर रोजी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, विदर्भ केसरी संजय तिरथकर, अकोला जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे, स्पर्धा संयोजक योगेश शिर्के याच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत अकोला पाठोपाठ अमरावती व वाशिमच्या मल्लांनी यश मिळविले. १४, १७, १९ आतील गटात फ्री स्टाईल प्रकारात कुस्तीगीरंानी खेळप्रदर्शन केले.१४ वर्षाआतील गटात योगेश माधवे अकोला, पंकज माधवे अकोला, निखिल सारवान अमरावती, महेश जाधव अकोला, अर्जुनसिंग राहल अमरावती, प्रेमकुमार सोनी अकोला, मनीष इंगळे अकोला, अक्षय सिरसाट अकोला, १७ वर्षाआतील गटात गोविंद कपाटे अमरावती, दानिश अहमद अमरावती, विक्रम मुळे यवतमाळ, गणेश नागे अकोला, जगदीश इंगोले वाशिम, अविनाश कुरकुटे अमरावती, अक्षय घाटे यवतमाळ, ज्ञानेश्वर बरंगे वाशिम, हर्षल अकोटकर अमरावती, प्रतीक मात्रे बुलडाणा, १९ वर्षाआतील गटात दिलीप तांभोरे अमरावती, अमिर अब्दुल अमरावती, फिरोज अहमद अमरावती, लक्ष्मण इंगोले वाशिम, शुभम भारद्वाज वाशिम, राहुल तिडके अमरावती, सुजीत तेलगोटे अकोला, अमोल कांबळे अमरावती, सौरभ राजपूत अकोला यांचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)