स्पोर्ट : मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय ५४-४ ने विजयी जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धा

By Admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:21+5:302014-09-07T00:04:21+5:30

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार ६ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने तब्बल ५० गुणांची आघाडी घेत पटकाविले.

Sport: Mohri Devi Khandelwal School 54-4 won district level school kabaddi competition | स्पोर्ट : मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय ५४-४ ने विजयी जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धा

स्पोर्ट : मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय ५४-४ ने विजयी जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धा

ोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार ६ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने तब्बल ५० गुणांची आघाडी घेत पटकाविले.
महानगरपालिका क्षेत्रातील १९ वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामना मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय व प्राजक्ता कन्या विद्यालयात झाला. मागील दशकापासून राज्यात बलाढ्य मानल्या जाणार्‍या प्राजक्ता कबड्डी संघाला या स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. एकेकाळात बलाढय समजल्या जाणार्‍या मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाने या विजयामुळे परत लय पकडली असल्याचे मैदानावर चित्र होते. मध्यंतरापर्यंत आघाडीवर असलेल्या प्राजक्ता संघाला नमवून मोहरीदेवी संघाने ५४-४ असा दणदणीत विजय मिळविला. मुलांच्या गटातील अंतिम सामने ९ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे संयोजक क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार होते. (क्रीडा प्रतिनिधी)...

Web Title: Sport: Mohri Devi Khandelwal School 54-4 won district level school kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.