स्पोर्ट: क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांचा सन्मान
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:45+5:302014-08-28T20:55:45+5:30
अकोला : प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रभात किड्स, सोमठाणा येथे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

स्पोर्ट: क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांचा सन्मान
अ ोला : प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार प्रभात किड्स, सोमठाणा येथे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी करण्यात आला.क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. क्रीडा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणारे साहेबराव ठाकरे, कमल चिमा, हॉकी प्रशिक्षक रघुवरसिंग ठाकूर, नंदू गोरे, गणेश मंगरूळकर, पुरण गंगतिरे, सुरेश ठाकरे, सतीशचंद्र भ, प्रशांत पावडे, सुरेश राऊत यांच्यासह इम्रान खान, जीवन सोनटक्के, मोहम्मद सातीब, राजू उखळकर, प्रवीण ठाकरे, चेतन नागझिरे, प्रबोध देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर नीरज आवंडेकर, मनोहर मिश्रा, अशोक ढेरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप अवचार यांनी केले. कार्यक्रमाला प्रशिक्षक संतोष लोमटे, पवन हलवणे, नंदकिशोर डंबाळे उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: सत्कार कार्यक्रमाला उपस्थित क्रीडाक्षेत्रातील मान्यवर. -२९सीटीसीएल३९...