स्पोर्ट: होलीक्रॉस कॉन्व्हेंट व कारमेल स्कूल विजयी जिल्हा स्तर शालेय क्रिकेट स्पर्धा
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:23+5:302014-09-11T22:31:23+5:30
अकोला: महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामने गुरुवारी पार पडले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना उद्या शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी होलीक्रॉस कॉन्व्हेंट व माऊंट कारमेल इंग्लिश स्कूल संघात होणार आहे. आज झालेल्या उपान्त्यफेरीतील सामन्यात गुरूनानक विद्यालय व कोठारी कॉन्व्हेंटला पराभव स्वीकारावा लागला.

स्पोर्ट: होलीक्रॉस कॉन्व्हेंट व कारमेल स्कूल विजयी जिल्हा स्तर शालेय क्रिकेट स्पर्धा
अ ोला: महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामने गुरुवारी पार पडले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना उद्या शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी होलीक्रॉस कॉन्व्हेंट व माऊंट कारमेल इंग्लिश स्कूल संघात होणार आहे. आज झालेल्या उपान्त्यफेरीतील सामन्यात गुरूनानक विद्यालय व कोठारी कॉन्व्हेंटला पराभव स्वीकारावा लागला.पहिल्या उपान्त्य सामना होलीक्रॉस व गुरूनानक विद्यालयात झाला. होलीक्रॉसने प्रथम फलंदाजी करीत गुरूनानक विद्यालयासमोर ३३ धावांचे लक्ष्य ठेवले. मयंक व पीयूष सावरकर यांनी अनुक्रमे १० व ११ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुरुनानक संघाचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. होलीक्रॉसच्या पीयूष सावरकर याने २ व आनंद इंगळे आणि ऋषी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसरा उपान्त्य सामना कारमेल स्कूल व कोठारी कॉन्व्हेंट संघात खेळला गेला. कारमेलने प्रथम फलंदाजी करीत ५१ धावांचे लक्ष्य कोठारी संघासमोर ठेवले. कारमेलचा अष्टपैलू खेळाडू आकाश राऊत याने नाबाद १६ तर संकेत डिक्कर याने नाबाद ९ धावा काढल्या. अजलान राजा याने ८ तर सिद्धार्थ दहातोंडे याने ६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात कोठारी कॉन्व्हेंट ३४ धावा काढून गारद झाला. देव राठी याने १८ आणि हर्षल याने ८ धावांचे योगदान दिले. कारमेलच्या आकाश राऊत, सिद्धार्थ दहातोंडे, शिवम, मंदार अलोणे, संकेत डिक्कर यांनी सुंदर गोलंदाजी करीत संघाची अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. (क्रीडा प्रतिनिधी)बॉक्सआकाश राऊत नाबाद माऊंट कारमेल स्कूलचा सलामीचा फलंदाज आकाश राऊत याने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात नाबाद खेळी केली. प्रत्येक सामन्याचा विजयी शिल्पकार ठरत संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला. आकाशने बाल शिवाजी संघाविरुद्ध नाबाद २६, राजेश्वर कॉन्व्हेंट विरुद्ध नाबाद १६, आजच्या उपान्त्यफेरीतदेखील कोठारी कॉन्व्हेंट विद्ध नाबाद १६ धावा ठोकल्या. ...