स्पोर्ट: जुने शहरात आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा उपक्रम
By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:15+5:302014-08-27T21:30:15+5:30
अकोला: जिल्ात कुस्ती कलेचा विकास आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावा व त्याचा लाभ जुन्या व नव्या पिढीतील मल्लांना घेता यावा, यासाठी जुने शहरातील शिवाजीनगरातील संत गाडगेबाबा व्यायामशाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते बुधवार, २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

स्पोर्ट: जुने शहरात आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा उपक्रम
अ ोला: जिल्ात कुस्ती कलेचा विकास आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावा व त्याचा लाभ जुन्या व नव्या पिढीतील मल्लांना घेता यावा, यासाठी जुने शहरातील शिवाजीनगरातील संत गाडगेबाबा व्यायामशाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते बुधवार, २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅट ट्रेन्झ कंपनीची असून, १२ बाय १२ मीटर कव्हरसह व्यायामशाळेला देण्यात आली. या व्यायामशाळेत अकोला जिल्हा तालुका कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राद्वारे अकोला तालुक्यातील नवोदित कुस्तीगिरांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्याला जुन्या पिढीतील नामवंत मल्ल शिवाजीराव इचे, रणजितसिंह एललकार, रमेश मोहोकार, रूपलाल मलिये, बल्लू बुलबुले, बंडू चांदूरकर, श्रीधर वानखडे, राजू इंगळे, मुरलीधर वानखडे, रामरत धुर्वे, अशोक घोडके, रवी मुळे, नारायण नागे उपस्थित होते. अकोला जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी शेखर पाटील यांचा व्यायामशाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले.(क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटवरील रंगलेली पहिली कुस्ती लढत.-२८सीटीसीएल४३...