स्पोर्ट: माऊंट कारमेल व गाडगे महाराज विद्यालयाचे वर्चस्व जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धा

By Admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:30+5:302014-09-26T23:15:30+5:30

अकोला : ऑफिसर्स क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा १४,१७,१९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात घेण्यात आली. यामध्ये अकोला जिल्हा ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत माऊंट कारमेल स्कूल अकोला व गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर संघातील खेळाडूंनी बाजी मारली.

Sport: District level school lawn tennis tournament dominated by Mount Carmel and Gadge Maharaj Vidyalaya | स्पोर्ट: माऊंट कारमेल व गाडगे महाराज विद्यालयाचे वर्चस्व जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धा

स्पोर्ट: माऊंट कारमेल व गाडगे महाराज विद्यालयाचे वर्चस्व जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धा

ोला : ऑफिसर्स क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा १४,१७,१९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात घेण्यात आली. यामध्ये अकोला जिल्हा ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत माऊंट कारमेल स्कूल अकोला व गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर संघातील खेळाडूंनी बाजी मारली.
स्पर्धेत महानगरपालिका क्षेत्र १४ वर्षाआतील मुलांच्या गटात वेदांत शहा (माऊंट कारमेल), इंद्रजित त्रिफाल (माऊंट कारमेल), क्रिष्णा चांडक (माऊंट कारमेल), सुमित शर्मा, पवन बिरकड होलीक्रॉस कॉन्व्हेंट, १७ वर्षाआतील गटात हर्ष सराटे (एसओएस), वेदांत बियाणी (माऊंट कारमेल), अक्षय मालू (कोठारी कॉन्व्हेंट), पुष्कर एकबोटे (कोठारी कॉन्व्हेंट), मयंक मालोकार (माऊंट कारमेल), १९ वर्षाआतील गटात प्रशांत वाघमारे (जीएस कॉन्व्हेंट), अंकित पोपट (आरएलटी कॉलेज), कौस्तुभ अंभोरे (ज्योती जानोळकर) महाविद्यालय यांनी विजय मिळविला.
जिल्हा क्षेत्रात १७ वर्षाआतील गटात पवन निघोटे, यश धोटे, भावेश वानखडे, राहुल बायनकर, तेजस वीर सर्व गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर, १९ वर्षाआतील गटात ऋषिकेश भिंगारे, गौरव वाघमारे (गाडगेबाबा महाराज महाविद्यालय), १४ वर्षाआतील मुलींमध्ये तेजस्विनी गावंडे, देवश्री मोरे (काकाणी महाविद्यालय मूर्तिजापूर), १७ वर्षाआतील गट शिवानी बोपूलकर, जयश्री राऊत, वैष्णवी राऊत, मनीषा इंगळे, स्वाती वानखडे (गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर), १९ वर्षाआतील गटात जया कांबळे, प्रणाली थोरात (गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर) यांनी विजय मिळविला. स्पर्धेत पंच म्हणून देवेंद्र इंगळे, कौस्तुभ धोत्रे, शंकर वैरागडे, अशोक ठोकळ यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)
...

Web Title: Sport: District level school lawn tennis tournament dominated by Mount Carmel and Gadge Maharaj Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.