दर्जा उंचावण्यासाठी अकॅडमीवर खर्च करा

By Admin | Updated: October 12, 2015 23:48 IST2015-10-12T23:48:26+5:302015-10-12T23:48:26+5:30

भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याचे समर्थन केले आहे. तसेच लीगच्या पदाधिकाऱ्यांनी भारताचा हॉकीतील दर्जा आणखी उंचावण्यासाठी अकॅडमींची

Spend on academy to raise standards | दर्जा उंचावण्यासाठी अकॅडमीवर खर्च करा

दर्जा उंचावण्यासाठी अकॅडमीवर खर्च करा

बंगळुरू : भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्ले याने हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याचे समर्थन केले आहे. तसेच लीगच्या पदाधिकाऱ्यांनी भारताचा हॉकीतील दर्जा आणखी उंचावण्यासाठी अकॅडमींची स्थापना करण्यावर पैसे खर्च करायला हवे, अशी पुस्तीही त्याने जोडली.
हॉकी इंडियाने सरकारची परवानगी घेऊन पाकिस्तानी खेळाडूंना हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी करून घ्यायला हवे, असेही पिल्लेने म्हटले. पिल्ले येथे बंगळुरू कपच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी आला आहे. तो एअर इंडिया संघाचा प्रशिक्षक आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्या खराब वर्तणुकीमुळे माफी मागितली नाही. त्यामुळे ते लीगमधून बाहेर असल्याचेही पिल्ले याने सांगितले. देशातील हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी अकॅडमी स्थापन करण्यावर जोर देताना पिल्लेने हॉकी इंडिया लीगच्या पदाधिकाऱ्यांनी काही पैसे अकॅडमी स्थापन करण्यावर लावले पाहिजेत, असे सांगितले. हॉकी इंडिया लीगच्या पदाधिकाऱ्यांनी काही पैसा अकॅडमी स्थापन करण्यावर खर्च करायला हवा. (वृत्तसंस्था)

Web Title: Spend on academy to raise standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.