दीपिका, सौरवची खास कामगिरी
By Admin | Updated: September 23, 2014 06:04 IST2014-09-23T06:04:36+5:302014-09-23T06:04:36+5:30
भारताला स्क्वॅश कोर्टवर आनंदाची वार्ता मिळाली. घोषालने दोनवेळचा पूर्व चॅम्पियन व अव्वल १० खेळाडूंमध्ये समावेश

दीपिका, सौरवची खास कामगिरी
भारताला स्क्वॅश कोर्टवर आनंदाची वार्ता मिळाली. घोषालने दोनवेळचा पूर्व चॅम्पियन व अव्वल १० खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या मलेशियाच्या ओंग बेंग ही याचा केवळ ४५ मिनिटांमध्ये ११-९, ११-४, ११-५ ने धुव्वा उडविला. घोषाल अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. घोषालला मंगळवारी होणाऱ्या अंतिम लढतीत विश्व क्रमवारीत ४६ व्या स्थानावर असलेल्या कुवेतचा खेळाडू अब्दुल्ला अल-मुजायेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मुजायेनने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या मॅक्स लीचा ३-२ ने पराभव केला.
त्याआधी, जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या दीपिका पल्लिकलला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या निकोल डेव्हिडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. डेव्हिडने २३ वर्षीय दीपिकाचा ११-४, ११-४, ११-५ ने पराभव केला.