शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Women's World Cup : लेकीनं देशाला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन पण 'बाप' नावाच छत्र हरपलं, वाचा हृदयद्रावक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:57 IST

महिला फिफा विश्वचषक २०२३ चा किताब स्पेनने उंचावला.

FIFA Women's World Cup : महिला फिफा विश्वचषक २०२३ चा किताब स्पेनने उंचावला. अंतिम सामन्यात इंग्लंडला १-० अशा फरकाने पराभवाची धूळ चारत स्पेनने विजयावर शिक्कामोर्तब करून इतिहास रचला. लक्षणीय बाब म्हणजे २०११ नंतर प्रथमच फिफा महिला फुटबॉलला नवा चॅम्पियन मिळाला आहे. स्पेनने प्रथमच महिला फिफा विश्वचषक जिंकला. फायनल सामन्यात स्पेनसाठी ऐतिहासिक आणि निर्णायक गोल करणाऱ्या ओल्गा कार्मोनाच्या या विजयाचा आनंद सामना संपल्यानंतर दु:खात बदलला. कारण आपल्या देशाला जगज्जेते बनवणाऱ्या लेकीनं तिचे वडील कायमचे गमावले होते. 

स्पेनच्या खेळाडूची हृदयद्रावक कहाणीस्पॅनिश फुटबॉल महासंघाने सोमवारी याबाबत माहिती दिली असून कार्मोनाचे वडील आजारी असल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. कार्मोनाची आई आणि इतर नातेवाईक अंतिम सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. रविवारी सिडनी ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्यात स्पेनने इंग्लंडचा पराभव करून महिला फिफा विश्वचषकाला एक नवीन चॅम्पियन दिला. स्पेनसाठी कर्णधार ओल्गा कार्मोनाने विजयी गोल केला. या एका गोलच्या जोरावर स्पेनने १-० असा विजय नोंदवला. हा गोल २९व्या मिनिटाला झाला आणि यासह स्पेन संघ प्रथमच विश्वविजेता बनला. दुसरीकडे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्याचे इंग्लंडचे स्वप्न भंगले.

स्पॅनिश खेळाडू भावुक आपले वडील या जगात नसल्याचे स्पेनच्या खेळाडूला सामन्यानंतर समजले. वडिलांच्या निधनानंतर कार्मोनाने एक भावुक पोस्ट करत म्हटले, "सामना सुरू होण्यापूर्वी माझ्यासोबत माझा 'स्टार' होता. मला माहित आहे की तुम्ही मला काहीतरी विशेष साध्य करण्याची शक्ती दिली आहे. मला माहित आहे की, आज रात्री तुम्ही मला पाहत असाल आणि तुम्हाला माझा अभिमान वाटत असेल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो डॅड." 

स्पेनची ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडचे स्वप्न भंगलेफिफा महिला विश्वचषक जिंकण्याबरोबरच स्पेन गतविजेत्यांप्रमाणे एकाच वेळी तिन्ही फिफा विश्वचषक विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला. स्पेनने २०२२ मध्ये फिफा अंडर-१९ विश्वचषक, २०२२ मध्ये अंडर-२० महिला विश्वचषक आणि २०२३ मध्ये फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह स्पेन संघ महिला फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पाचवा संघ ठरला आहे. अमेरिकेने सर्वाधिक चारवेळा फिफा विश्वचषकाचा किताब पटकावला आहे.  

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२WomenमहिलाDeathमृत्यूEnglandइंग्लंड