दक्षिण आशियाई स्पर्धेच्या शुंभकर, लोगोचे अनावरण
By Admin | Updated: December 13, 2015 23:07 IST2015-12-13T23:07:39+5:302015-12-13T23:07:39+5:30
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा २०१६ च्या आयोजन समितीने आज येथे एका सोहळ्यात स्पर्धेचा शुभंकर आणि लोगोचे अनावरण केले.

दक्षिण आशियाई स्पर्धेच्या शुंभकर, लोगोचे अनावरण
गुवाहाटी : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा २०१६ च्या आयोजन समितीने आज येथे एका सोहळ्यात स्पर्धेचा शुभंकर आणि लोगोचे अनावरण केले.
सोहळ्याचे आयोजन येथे आयटीए सांस्कृतिक केंद्र, माचखोवा येथे केले गेले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल व मेघालयाचे क्रीडामंत्री जेनिथ संगमा उपस्थित होते. गुवाहाटी आणि शिलाँग येथे ६ ते १६ फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा होत आहेत. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत आठ देशांतील जवळपास ४,५०० खेळाडू आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अनावरण करण्यात आलेला शुभंकर नंतर असम बाइकर्स ग्रुपच्या बायकर्सच्या साथीने शहरात फिरवला गेला. या स्पर्धेच्या लोगोत आठ पंख आहेत जे १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.(वृत्तसंस्था)