दक्षिण आफ्रिकेची खराब सुरवात, २ बाद २८ धावा
By Admin | Updated: November 5, 2015 17:28 IST2015-11-05T11:37:36+5:302015-11-05T17:28:44+5:30
आर. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेचे फलंदाज आले आहेत. सुरवातीलाच त्यांना दोन धक्के मिळाले आहेत. अश्विनने स्टिअॅनला तर जडेजाने ड्यु प्लेसिसला तंबूत पाठवले.

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरवात, २ बाद २८ धावा
>ऑनलाइन लोकमत
चंदिगढ, दि. ५ - आर. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेचे फलंदाज आले आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी २८ धावांमध्ये अफ्रिकेचे दोन गडी तंबूत परतले होते. अश्विनने स्टिअॅनला तर जडेजाने ड्यु प्लेसिसला तंबूत पाठवले. १६ षटकानंतर द. आफ्रिकाने २ गडी गमावत २८ धावा केल्या आहेत. कर्णधार आमला(९) आणि डीन एल्गार (१३) मैदानावर खेळत आहेत.
त्यापुर्वी डीन एल्गारच्या फिरकीने पहिल्या कसोटीत सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या २०१ धावांवर संपुष्टात आला. मुरली विजयच्या ७५ व रविंद्र जडेजाच्या ३८ धावांची खेळी वगळता अन्य एकही फलंदाज आफ्रिकेच्या मा-यासमोर तग धरु शकला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताचा शिखर धवन हा सलामीचा फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर थोडा स्थिरावलेला पुजाराही ३१ धावांवर बाद झाला आणि विराट कोहलीही अवघी १ धाव काढून तंबूत परतला. त्यानंतर मुरली विजयने अजिंक्य रहाणेच्या साथीने सावध फलंदाजी करत भारताला १०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र त्यानंतर रहाणे (१५) व त्यापाठोपाठी वृद्धीमान सहा (०) पटापट बाद झाले. मुरली विजयने ७५ धावांची संयमी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्मरच्या गोलंदाजीवर विजय पायचीत झाला व भारताच्या आशा मावळल्या. यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनने (२०) एकाकी झूंज देत भारताला १७५ चा पल्ला गाठून दिला. उमेश यादव ५ तर वरुण अॅरोन शून्यावर बाद झाला. आफ्रिकेतर्फे एल्गारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर इम्रान ताहिर व फिलँडरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्मर व रबादाने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावाही गाठता आल्या नाहीत.
टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने भारताची अवस्था बिकट झाली आहे.