दक्षिण आफ्रिका ७२ दिवसांच्या भारत दौ-यावर
By Admin | Updated: July 27, 2015 16:59 IST2015-07-27T16:54:45+5:302015-07-27T16:59:05+5:30
दक्षिण आफ्रिकेचा संघ २८ सप्टेंबरपासून ७२ दिवसांच्या भारता दौ-यावर येत असून या दौ-यात तीन टी -२०, पाच एकदिवसी व चार कसोटी सामने होणार आहेत.

दक्षिण आफ्रिका ७२ दिवसांच्या भारत दौ-यावर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दक्षिण आफ्रिकेचा संघ २८ सप्टेंबरपासून ७२ दिवसांच्या भारता दौ-यावर येत असून या दौ-यात तीन टी -२०, पाच एकदिवसी व चार कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर - नोव्हेंबर हा महिना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
सोमवारी बीसीसीआय व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्टाच्या अधिका-यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या दौ-याची औपचारिक घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल ७२ दिवसांच्या भारत दौ-यावर येत असून द.आफ्रिकेचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा भारत दौरा आहे. या दौ-याचे वैशिष्ट्य म्हणजे या दौ-यातील दुसरा कसोटी सामना बंगळुरु येथे होणार असून हा सामना आफ्रिकेला फलंदाज ए बी डिव्हिलियर्सचा १०० वा कसोटी सामना आहे व आयपीएलमध्ये डिव्हिलियर्स हा रॉयल चॅलेंजर बंगळुरुकडून खेळतो.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी पंजाबमधील हल्ल्यानंतर पाक बोर्डाला खडे बोल सुनावले आहे. भारताच्या सुरक्षेसोबत तडजोड करुन आम्ही पाकसोबत क्रिकेट खेळणार नाही असे ठाकूर यांनी म्हटले असून यामुळे आता भारत - पाक मालिका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
, आम्हाला पाकचा हल्ला करणार नाही
दौ-याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
२९ सप्टेबर - दिल्ली येथे दोन्ही संघांमध्ये टी - २० सराव सामना होईल.
टी - २० सामन्याची मालिका
२ ऑक्टोबर - धर्मशाला
५ ऑक्टोबर - कटक
८ ऑक्टोबर - कोलकाता
पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका
११ ऑक्टोबर - कानपूर
१४ ऑक्टोबर - इंदौर
१८ ऑक्टोबर - राजकोट
२२ ऑक्टोबर - चेन्नई
२५ ऑक्टोबर - मुंबई
तीन कसोटी सामन्यांची मालिका
५ ते ९ नोव्हेंबर - मोहाली
१४ ते १८ नोव्हेंबर - बंगळुरु
२५ ते २९ नोव्हेंबर - नागपूर
३ ते ७ डिसेंबर - दिल्ली