दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहास

By Admin | Updated: October 7, 2016 02:39 IST2016-10-07T02:39:48+5:302016-10-07T02:39:48+5:30

डेव्हिड मिलर (नाबाद ११८) व क्वांटन डिकॉक (७०) यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाच्या ३७२ धावांचे आव्हान सहज पेलले

South Africa created history for the second time | दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहास

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहास

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहास
दरबन : डेव्हिड मिलर (नाबाद ११८) व क्वांटन डिकॉक (७०) यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाच्या ३७२ धावांचे आव्हान सहज पेलले. आफ्रिकेने ४ गडी राखून विजय संपादन करून इतिहासातील दुसरा मोठा विजय साकारला.
किग्समीड मैदानावर दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. डेव्हिड वॉर्नर (११७), कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१०८) व अ‍ॅरॉन फिंच (५३) यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ३७१ धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टेन व इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.
आॅस्ट्रेलियाच्या ३७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या फलंदाजांनीही चौकार, षटकारांची आतषबाजी केली. आफ्रिकेने ४९.२ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ३७२ धावा करून एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय संपादन केला.
दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने (नाबाद ११८), क्वांटन डिकॉकने (७०), हशिम आमलाने (४५) तर एंडिले फेहलुकवायो याने (नाबाद ४२) धावा केल्या. मिलरने ७९ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांची बरसात केली.
दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी १२ मार्च २००६ रोजी जोहान्सबर्गमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४३४ धावांचा पाठलाग करताना ४३८ धावा करून विजय मिळविला होता.
संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया : ५० षटकांत ६ बाद ३७१ (डेव्हिड वॉर्नर झे. ड्युमिनी गो. ताहीर ११७, अ‍ॅरॉन फिंच झे. रबाडा गो. ताहीर ५३, स्मिथ त्रिफळा गो. स्टेन १०८, जॉर्ज बेली झे. ड्युप्लेसिस गो. फेहलुकवायो २८, टी.एम. हेड झे. गो. रबाडा ३५, डेल स्टेन २/९६, ताहीर २/५४, रबाडा १/८६).
दक्षिण आफ्रिका : ४९.२ षटकांत ६ बाद ३७२ (डिकॉक झे. वॉरल्ल गो. ट्रीमेन ७०, हशिम आमला पायचित हेस्टिंग्ज ४५, डेव्हिड मिलर नाबाद ११८ ,फेहलुकवायो नाबाद ४२, हेस्टिंग्ज २/७९, ट्रीमेन १/६५, मार्श १/६१, झम्पा १/५५, हेड १/३१).

Web Title: South Africa created history for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.