दक्षिण आफ्रिका-बांगलादेश कसोटी अनिर्णीत

By Admin | Updated: August 4, 2015 00:39 IST2015-08-04T00:39:05+5:302015-08-04T00:39:05+5:30

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशदरम्यान सुरू असलेला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आज

South Africa-Bangladesh Test draw | दक्षिण आफ्रिका-बांगलादेश कसोटी अनिर्णीत

दक्षिण आफ्रिका-बांगलादेश कसोटी अनिर्णीत

ढाका : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशदरम्यान सुरू असलेला दुसरा आणि अखेरचा कसोटी
सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आज अनिर्णीत राहिला. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अखेरचे चार दिवस खेळ होऊ शकला नाही.
शेर-ए-बांगला स्टेडियमवर अखेरच्या दिवसाचा खेळ आऊटफिल्ड ओलसर असल्यामुळे सकाळीच रद्द करण्यात आला. या कसोटीत फक्त पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला. त्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून ८ बाद २४६ धावा केल्या होत्या.
या सामन्यात वेगवान गोलंदाज डेल स्टेन कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी मिळवणारा शॉन पोलॉकनंतर दुसरा दक्षिण आफ्रिकन गोलंदाज ठरला. चित्तगाव येथील पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे ही मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
ही मालिका विचित्र होती, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला याने म्हटले. तो म्हणाला, ‘‘जर ही कसोटी दक्षिण आफ्रिकेत असती, तर ती कालच रद्द झाली असती. या आऊटफिल्डवर खेळणे शक्यच नव्हते. ही खूपच विचित्र मालिका होती.
मी अशा प्रकारची मालिका खेळलो नाही, की ज्यात १० दिवसांपैकी ६ दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: South Africa-Bangladesh Test draw