सौम्यजीत घोष अंडर-21 च्या उपांत्यफेरीत
By Admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:03+5:302014-06-20T21:25:03+5:30

सौम्यजीत घोष अंडर-21 च्या उपांत्यफेरीत
>योकोहामा: भारताच्या सौम्यजीत घोषने आपल्याच देशाच्या हरमित देसाईचा शुक्रवारी एकतर्फी लढतीत 4-1 ने पराभव करीत 21 वर्षांखालील आयटीएफ जपान ओपन सुपर सीरिज टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आह़े माजी राष्ट्रीय चॅम्पियन घोषने ही लढत 35 मिनिटांत जिंकली़ घोषची शनिवारी उपांत्यफेरीमध्ये ब्राझीलच्या कालडेरेनाविरुद्ध लढत होईल़ कालडेरेनाने जपानच्या असूका सकईवर 4-3 ने विजय मिळवला़ घोषने देसाईविरुद्धची लढत 11-13, 11-7, 11-6, 11-8, 11-5 अशी जिंकली़ पुरुष गटामध्ये अचंत शरत कमलने रशियाच्या किरिल स्काचकोलचा राऊंड 32 मध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला़ आता त्याची लढत जपानच्या मिजुतानीशी होईल़ (वृत्तसंस्था)