मेरी कोमने मागितली देशाची माफी
By Admin | Updated: July 16, 2016 21:23 IST2016-07-16T21:23:47+5:302016-07-16T21:23:47+5:30
लंडन ऑॅलिम्पिकची कांस्य विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यात अपयशी ठरल्याबद्दल देशाची माफी मागितली

मेरी कोमने मागितली देशाची माफी
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 16 - लंडन ऑॅलिम्पिकची कांस्य विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यात अपयशी ठरल्याबद्दल देशाची माफी मागितली. मेरी कोम शनिवारी विजेंदर- केरी होप यांच्यातील सुपर मिडलेवट लढतीसाठी उपस्थित होती.
मेरीचे आगमन होताच त्यागराज स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांनी उभे राहून तिचे अभिवादन केले. चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत मेरीने ऑॅलिम्पिक पात्रता चाचणीतील अपयशाबद्दल क्षमा मागितली. आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही याबद्दल खेद असल्याचे मेरीने सांगितले.