शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

‘सर्व्हर’ बंद पडताच ‘टीम इंडिया’त वाढली होती चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:42 IST

ऑलिम्पियाड चॅम्पियन भारतीय संघातील भक्ती कुलकर्णीने शेअर केला विजयानंतरचा अनुभव

- सचिन कोरडेपणजी : जगज्जेत्या विश्वनाथन आनंदलाही यापूर्वी इतका ‘आनंद’ झाला नसेल जो यावेळी झाला. कारण ऑनलाईन पद्धतीने खेळत भारताने ऑलिम्पियाड स्पर्धेचे संयुक्त विश्वविजेते होण्याचा मान मिळवला.  बुद्धिबळातील हा एक ऐतिहासिक ‘ऑनलाईन’ विजय ठरला. मात्र, ऑनलाईन खेळ करताना अडचणींचा सामना करण्याचे धैर्यही तितकेच असावे लागते. याचा प्रत्यय भारतीय संघातील प्रत्येकाला आला.शेवटच्या फेरीत भारत विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर होता. अशावेळी अचानक सर्व्हर बंद पडलाआणि जवळपास पाऊण तास वाया गेला. वेळ वाया गेल्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळणार होता. मात्र संघातील दोन खेळाडूंनी फिडेकडे समस्या मांडल्याने भारताला न्याय मिळाला आणि टीमने एकच जल्लोष केला. ऑलिम्पियाड संघात भारताचे प्रतिनिधित्व करणारी गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्तीने ‘लोकमत’ शी आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, लॉकडाऊननंतर आम्ही बऱ्याच ऑनलाईन स्पर्धा खेळलो. मात्र त्याचा इतका दबाव नव्हता. एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या विजयानजीक पोहचल्यानंतर अशा प्रकारची तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्याचे खूप वाईट वाटते. परंतु, फिडेने आमच्यावर अन्याय होऊ दिला नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. संयुक्त विश्वविजेतेपदाचा निर्णय होताच आम्ही एकच जल्लोष केला. व्हिडिओ कॉलवर सर्वांशी चर्चा केली. विश्वनाथन आनंद यांनी आम्हा सर्वांचे कौतुक केले. निश्चितच, माझ्यासारख्या खेळाडूसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. या स्पर्धेपूर्वी आम्ही काही सराव सामने खेळलो. मात्र तो एक वैयक्तीक अभ्यास होता. मी रघुनंदन गोखले सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. तेही उपयोगी ठरले.१ लाख लोक पाहत होते सामनेबुद्धिबळ या खेळाशी संबंधित असणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देश-विदेशातील खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमी आॅनलाईन आॅलिम्पियाड स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहत होते. जवळपास १ लाखांहून अधिक लोक ‘यु ट्युब’ या चॅनेलवर सामने पाहत होते. त्यामुळे आम्हाला मोठी प्रेरणा मिळत होती. अनेक जण काही सल्लेही देत होते. या खेळाला फॉलो करणाºयांची संख्या मी तरी एवढी बघितली नव्हती. त्यामुळे या खेळाची लोकप्रियताही आम्हाला जाणवली. मी प्रत्येकाची आभारी आहे. या सर्वांचा पाठिंबा होता म्हणून आमचा संघ विश्वविजेता ठरला.कोविडचा परिणाम पण...कोविडमुळे सगळे क्रीडा क्षेत्रच हादरले आहे. मात्र, आम्ही फिडेचे खूप आभारी आहोत. कारण त्यांनी विश्व बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने विविध स्पर्धा आॅनलाईन पद्धतीने आयोजित केल्या. आॅनलाईन आॅलिम्पियाडचाभाग झाल्याचाही अभिमान आहे. बुद्धिबळ हा खेळ इंटरनेटच्या माध्यमातून खेळला जाऊ शकतो. त्यामुळे या खेळाचा आनंद घेता आला.

टॅग्स :Chessबुद्धीबळIndiaभारत