व्यासपीठ कोसळल्याने सोनोवाल यांना दुखापत

By Admin | Updated: July 7, 2015 00:48 IST2015-07-07T00:48:15+5:302015-07-07T00:48:15+5:30

भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठ अति वजनामुळे कोसळल्याने केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हे किरकोळ जखमी झाले.

Sonowal injured due to collapse of platform | व्यासपीठ कोसळल्याने सोनोवाल यांना दुखापत

व्यासपीठ कोसळल्याने सोनोवाल यांना दुखापत


डिब्रूगड (आसाम) : भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठ अति वजनामुळे कोसळल्याने केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हे किरकोळ जखमी झाले. या वेळी त्यांच्यासह अन्य १५ जणांनादेखील किरकोळ दुखापत झाली.
याविषयी भाजपाचे वरिष्ठ नेते उज्ज्वल कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा मोर्चाची बैठक झाल्यानंतर सुमारे १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी सोनोवाल यांच्या भेटीसाठी व्यासपीठावर गर्दी केली. मुळात हे व्यासपीठ २५ व्यक्तींसाठी असताना अचानक झालेल्या गर्दीने अतिभार झाला व व्यासपीठ कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार क्रीडामंत्री सोनोवाल यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sonowal injured due to collapse of platform