बलबीर सीनियरच्या जीवनात आल्या काही रोचक बाबी

By Admin | Updated: May 28, 2015 01:35 IST2015-05-28T01:35:28+5:302015-05-28T01:35:28+5:30

महान हॉकीपटू बलबीरसिंह सीनियर याच्या पंजाबीत लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रात अनेक रोचक बाबी पुढे आल्या आहेत.

Some interesting things come in the life of Balbir Sr. | बलबीर सीनियरच्या जीवनात आल्या काही रोचक बाबी

बलबीर सीनियरच्या जीवनात आल्या काही रोचक बाबी

चंदीगड : महान हॉकीपटू बलबीरसिंह सीनियर याच्या पंजाबीत लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रात अनेक रोचक बाबी पुढे आल्या आहेत. त्यात लेखकाने ९0 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असणारा हा दिग्गज प्रसिद्ध शीख योद्धा बाबा बिधीचंद यांचा वंशज असल्याचाही दावा केला आहे.
सेंटर फॉरवर्डच्या रूपाने खेळणारे ९१ वर्षीय बलबीर सीनियर यांचे आत्मचरित्र टोरँटोत राहणारे प्रिन्सिपल सरवनसिंह यांनी लिहिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन लवकरच होण्याची शक्यता आहे.
बलबीरसिंह यांची मुलगी सुशबीर भोमियानुसार, हे पुस्तक खूप अभ्यास केल्यानंतर लिहिण्यात आले आहे. तिने सांगितले, ‘‘सर्वात रोचक बाब म्हणजे लेखकांनी माझ्या वडिलांच्या वंशाची माहिती शोधून काढली. त्यांनी प्रसिद्ध शीख योद्धा व सहावे शीख गुरूहरगोविंद यांच्या सेवेत असणारे बाबा बिधीचंदजी यांचे वंशज वडील असल्याचे सांगितले आहे.’’
बाबा बिधीचंद हे सुरेख घोडेस्वार होते आणि एवढेच नव्हे, तर बलबीर सीनियर यांनीदेखील विविध विषयांवर ३७ पुस्तके लिहिली आहेत. तसेच लेखकांनाही त्यांनी घोडेस्वारी ही स्वाभाविकपणे आपल्याला येत होती असे सांगितले.(वृत्तसंस्था)

च्बलबीर सीनियर पंजाब पोलीसमध्ये होते आणि १९८२ मध्ये ते पंजाबच्या क्रीडा विभागात संचालक या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी १८४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी) आणि १९५६ (मेलबोर्न) येथे आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांचा १९५२ मधील आॅलिम्पिक फायनलमधील सर्वाधिक ५ गोलचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

Web Title: Some interesting things come in the life of Balbir Sr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.