सोमदेवने प्रशिक्षक बदलला
By Admin | Updated: October 30, 2015 22:23 IST2015-10-30T22:23:17+5:302015-10-30T22:23:17+5:30
जागतिक टेनिसमध्ये एकेरीत सोमदेव देववर्मनकडे भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार खेळ करताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे

सोमदेवने प्रशिक्षक बदलला
पुणे : जागतिक टेनिसमध्ये एकेरीत सोमदेव देववर्मनकडे भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार खेळ करताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मात्र सध्या सातत्याने अपयशी ठरणाऱ्या या खेळाडूच्या जागतिक मानांकनामध्येही मोठी घसरण होत आहे. यामुळेच सोमदेवने दमदार पुनरागमनासाठी कंबर कसली असूंन यासाठी त्याने नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
पुणे येथे सुरु असलेल्या एटीपी चँलेंजर स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत एन. विजय सुंदर पार्शनाथ यांच्या विरुध्द पराभूत झाल्यानंतर सोमदेवने आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी तो दररोज किमान पाच तास कसून सरावही करीत आहे. विशेष म्हणजे स्कॉट मॅककेन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष खेळल्यानंतर सोमदेवने आता आपला प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला .