सोलापूर - बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड
By Admin | Updated: June 11, 2016 17:41 IST2016-06-11T15:39:31+5:302016-06-11T17:41:26+5:30
सानिया मिर्झाने प्रार्थना ठोंबरेच्या नावाला पसंती दिल्यानंतर तिची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे

सोलापूर - बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड
>ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 11 - टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. महत्वाचं म्हणजे सानिया मिर्झाने प्रार्थना ठोंबरेच्या नावाला पसंती दिल्यानंतर तिची निवड करण्यात आली आहे. प्रार्थना ठोंबरे बार्शीची रहिवासी आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाल्याने गावामध्ये जल्लोषाचे वातावरण झालं आहे.
सानिया मिर्झाने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत प्रार्थनासोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंबंधी तिने अखिल भारतीय टेनिस संघटना अर्थात आयटालादेखील कळवलं होतं. सानियाने आपला निर्णय कळवल्यानंतरच आयटाने प्रार्थना ठोंबरेची निवड केली आहे. 21 वर्षीय प्रार्थनाने आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदं मिळवली आहेत. 2014 साली इन्चिऑन इथं झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनानं सानियाच्या साथीनं कांस्यपदक मिळवलं होतं.