सोलापूर अकॅडमीला विजेतेपद विजय चषक ४० षटकांचा सामना

By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:27+5:302015-08-03T22:31:27+5:30

सोलापूर: सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित विजय चषक ४० षटकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर क्रिकेट अकॅडमीने गुलमोहोर क्रिकेट क्लबवर ७२ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले़

Solapur Academy defeats championship champions 40 overs | सोलापूर अकॅडमीला विजेतेपद विजय चषक ४० षटकांचा सामना

सोलापूर अकॅडमीला विजेतेपद विजय चषक ४० षटकांचा सामना

लापूर: सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित विजय चषक ४० षटकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर क्रिकेट अकॅडमीने गुलमोहोर क्रिकेट क्लबवर ७२ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले़
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सोलापूर क्रिकेट अकॅडमीने ३४़४ षटकात १० बाद १६४ धावा केल्या़ यात राहुल सोनवणे ५९, सत्यजित जाधवने ४६ धावा केल्या़ गुलमोहोरकडून दिनेश गुंडने २०/३ बळी, ओम पवारने १९/२ बळी घेतले़ प्रत्युत्तरात गुलमोहोरने २०़४ षटकात १० बाद ९२ धावा केल्या़ यात अमित वाघमारेने २१धावा केल्या़ सोलापूर क्रिकेट अकॅडमीकडून श्रेयांश जहागीरदारने ४/३ बळी, राजेश येमूलने १५ धावात तीन बळी घेतले़ हा सामना सोलापूर क्रिकेट अकॅडमीने ७२ धावांनी जिंकला़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
विजय चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या सोलापूर क्रिकेट अकॅडमीच्या संघाला बक्षीस देताना मिलिंद थोबडे, किरण पवार, ए़डी़ चिन्नीवार, चंद्रकांत रेम्बर्सू, के़टी़पवार, उदय डोके, राजन कामत, उमेश मामड्याल, प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव़

Web Title: Solapur Academy defeats championship champions 40 overs