सोहम, धृव, संकेत व सानियाची बाजी
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:01+5:302015-05-05T01:21:01+5:30
रोलर स्केटींग स्पर्धा : स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

सोहम, धृव, संकेत व सानियाची बाजी
र लर स्केटींग स्पर्धा : स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मडगाव : हायपर रोलर स्केटर्स क्लबतर्फे रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ गोवा यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या अखिल गोवा पातळीवरील रोलर स्केटिंग स्पर्धेत सोहम पवार, धृव दलाल व संकेत नाईक यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण, तर मुलींच्या गटात सानिया नार्वेकर हिने सुवर्णपदक पटकावित स्पर्धा गाजविली. सहोम प्रशांत पवार याने ६ ते ८ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, धृव दलालने १० ते १२ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, संकेत प्रभू याने १६ वर्षांवरील गटात दोन सुवर्णपदके, गौरांग रायकर याने ८ ते १० वर्षांखालील गटात एक सुवर्ण व एक रौप्यपदक, क्रिश फर्नांडिस याने ८ ते १० वर्षांखालील गटात एक सुवर्ण व एक कांस्य पदक, सावियो लेंताव याने एक रौप्य व एक कांस्य पदक, तर मुलींच्या गटात सानिया शेट नार्वेकर हीने एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले.स्पर्धेचे परीक्षण पंच सतिश नाईक, मारीयो गोम्स, मुरली तळेकर व भाटीकर मॉडेल हायस्कूलचे शारीरिक शिक्षक संदेश गावकर यांनी केले. स्पर्धेत जवळपास १०० खेळाडूंनी भाग घेतला होता.दरम्यान, स्पर्धेचे बक्षीस वितरण पाजिफोंड येथील बिपीएस स्पोर्ट्स क्लब येथे झाले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते विजेत्या मुलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या वेळी बिपिएस क्लबचे अध्यक्ष मांगिरीश कुंदे, हायपर रोलर स्केटर्स क्लबचे उपाध्यक्ष प्रवीण नाईक उपस्थित होते.ढँङ्म३ङ्म : 0305-टअफ-28कॅप्शन: रोलर स्केटिंग स्पर्धेतील विजेते स्पर्धक. (छाया- पिनाक कल्लोळी)