शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...तर सेहवागचं तोंड होणार बंद

By admin | Updated: June 30, 2017 11:13 IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, वेंकटेश प्रसाद यांनी अर्ज केले आहेत. रवी शास्त्री यांनी अजून अर्ज केला नसला तरी..

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सध्या वेगवेगळया नावांची चर्चा असून, रवी शास्त्रींच्या बरोबरीने विरेंद्र सेहवागचे नावही या शर्यतीत आघाडीवर आहे. प्रशिक्षकपदासाठी सेहवागने फक्त दोन ओळींचा अर्ज केल्याचे वृत्त काही प्रसिद्धीमाध्यमांनी दिल्याने सेहवाग चर्चेत आला होता. मीडियामध्ये प्रसिध्द झालेली दोन ओळींच्या अर्जाची बातमी  खोडून काढताना सेहवागने आपण भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार अर्ज केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 
 
जर मला दोन ओळींचा अर्ज पाठवायचा असेल तर, त्यासाठी माझे नावच पुरेसे आहे असे सेहवागने म्हटले आहे. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर सेहवागची सोशल मीडियाच्या पीचवर जोरदार बॅटिंग सुरु असेत. त्याचे प्रत्येक टि्वट बातमीचा विषय बनतो. त्यामुळे उद्या जर सेहवागची प्रशिक्षकपदी निवड झालीच तर, त्याला तोंड बंद ठेवायला सांगितले जाईल असे डेक्कन क्रॉनिकलने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. 
 
आणखी वाचा 
 
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, वेंकटेश प्रसाद यांनी अर्ज केले आहेत. रवी शास्त्री यांनी अजून अर्ज केला नसला तरी, अर्ज करण्यासाठी सचिन तेंडुलकरने त्यांचे मन वळवले आहे. त्यामुळे शास्त्रींनी अर्ज केल्यास पहिली पसंती तेच असतील. कारण कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सचिन तेंडुलकरचा त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. 
 
बीसीसीआय विचारेल तेव्हाच मी मत मांडेन : कोहली
नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत बीसीसीआयने मत विचारले, तरच मी याबाबत माझे मत देईल, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. 
सचिनच्या मध्यस्थीनंतर शास्त्री कोचपदासाठी अर्ज करण्यास तयार
सचिनने रवी शास्त्रीशी चर्चा केल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला तयार झाले आहेत. प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सदस्यानेच थेट शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने शास्त्रींची अनिल कुंबळेंच्या जागी प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या रवी शास्त्री यांनी आपण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसल्याचे आधी म्हटले होते. संघ संचालक म्हणून चांगली कामगिरी केल्यानंतरही आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असा आरोप शास्त्रींनी केला होता.