..तर कतार वर्ल्डकपचे यजमानपद गमावणार
By Admin | Updated: June 8, 2015 00:55 IST2015-06-08T00:55:20+5:302015-06-08T00:55:20+5:30
रशिया आणि कतार हे दोन्ही देश अनुक्रमे २0१८ आणि २0२२ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गमावू शकतात, असे फिफाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

..तर कतार वर्ल्डकपचे यजमानपद गमावणार
जिनिव्हा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे सिध्द झाल्यास रशिया आणि कतार हे दोन्ही देश अनुक्रमे २0१८ आणि २0२२ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गमावू शकतात, असे फिफाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
फिफाच्या आॅडीटिंग आणि कम्प्लायन्स समितीचे प्रमुख डोमेनिको स्काला यांनी एका स्वीस दैनिकाशी बोलताना सांगितले की, ‘जर कतार आणि रशियाने लाच दिली असल्याचे पुरावे मिळाले तर त्या दोन्ही देशांकडून यजमानपद काढून घेतले जावू शकते. परंतु अद्याप असा पुराव मिळालेला नाही.’
फुटबॉल विश्वाला हादरवून सोडणाऱ्या स्कँडलनंतर फिफाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच याबाबत वाच्यता केली असून त्यामुळे कतार आणि रशियाचे यजमानपद धोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. ब्रिटनने गुरुवारी सांगितले होते की, कतारकडून २0२२च्या वर्ल्डकपचे यजमानपद काढून घेतल्यास ते स्पर्धा भरविण्यास उत्सुक आहेत.