स्मिथची भेदक गोलंदाजी; कोलकात्याचे गुजरातपुढे १२५ धावांचे आव्हान

By Admin | Updated: May 19, 2016 21:37 IST2016-05-19T21:37:41+5:302016-05-19T21:37:41+5:30

गुजरात लायन्सने नियंत्रित मारा करताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर रोखण्यात यश मिळविले.

Smith's penetrating bowling; Kolkata's 125 runs against Gujarat | स्मिथची भेदक गोलंदाजी; कोलकात्याचे गुजरातपुढे १२५ धावांचे आव्हान

स्मिथची भेदक गोलंदाजी; कोलकात्याचे गुजरातपुढे १२५ धावांचे आव्हान

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. १९ : आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’साठी दावेदारी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात गुजरात लायन्सने नियंत्रित मारा करताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर रोखण्यात यश मिळविले. अष्टपैलू स्मिथ याने भेदक मारा करताना ४ षटकात ८ धावा देताना मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, शकिब अल हसन आणि पीयूष चावला यांना बाद करून गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
ग्रीन पार्क येथे सुरू असलेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. कर्णधार गौतम गंभीर व उथप्पा या सलामीजोडीने कोलकाताला अपेक्षित आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गंभीर धावबाद झाल्याने कोलकाताला २३ धावांवर पहिला धक्का बसला. शादाब जकातीने केलेल्या अप्रतिम फेकीवर गंभीर धावबाद झाला. गंभीरने ८ चेंडूंत ८ धावा केल्या.
यानंतर स्मिथने आपली कमाल दाखवताना पांडे व उथप्पा या आक्रमक फलंदाजांना फारवेळ टिकून न देता झटपट बाद केले. उथप्पा १९ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २५ धावा काढून परतला, तर पांडे केवळ एक धाव काढून परतला. यानंतर फटकेबाजी करणार पीयूष चावलाही स्मिथच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने कोलकाताची १० षटकांत ४ बाद ५५ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यांतर आक्रमक यसूफ पणाणने आक्रमक खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने ३६ धावांची खेली केली. कुलकर्णी , ब्राव्हो आणि जकातीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

Web Title: Smith's penetrating bowling; Kolkata's 125 runs against Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.