स्मिथ, रैनाची दमदार खेळी

By Admin | Updated: April 23, 2015 02:40 IST2015-04-23T02:40:54+5:302015-04-23T02:40:54+5:30

ड्वेन स्मिथ (३९) आणि सुरेश रैना (खेळत आहे २८) यांच्या खेळामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

Smith, Raina | स्मिथ, रैनाची दमदार खेळी

स्मिथ, रैनाची दमदार खेळी

बंगळुरू : ड्वेन स्मिथ (३९) आणि सुरेश रैना (खेळत आहे २८) यांच्या खेळामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट
स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध १० षटकांपर्यंत २ बाद ८१ धावांपर्यंत मजल मारली होती. यावेळी सुरेश रैना व कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळत होते.
बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय युजवेंद्र चहलने दुसऱ्याच षटकात सार्थक ठरविला. त्याने ब्रॅँडन मॅक्युलमला ४ धावांवर रोसोयूच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. नंतर मात्र स्मिथ व सुरेश रैनाने संघाचा धावफलक हालता ठेवत धावा वाढविण्यास सुरुवात केली. त्यांनी संघाची धावसंख्या ७० पर्यंत नेवून ९ षटकांत डेवन स्मिथला हर्षल पटेलने बाद केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Smith, Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.