धुवांधार!

By Admin | Updated: November 14, 2014 02:51 IST2014-11-14T02:51:40+5:302014-11-14T02:51:40+5:30

दोन महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिलेले रोहित शर्मा नावाचे वादळ आज पुन्हा कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर घोंघावले.

Smash! | धुवांधार!

धुवांधार!

 डॅशिंग रोहित शर्माची आणखी एक डबल सेंच्युरी
दोन महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिलेले रोहित शर्मा नावाचे वादळ आज पुन्हा कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर घोंघावले. एकदिवसीय सामन्यातील द्विशतकाचा सचिन, सेहवाग आणि स्वत:चाही विक्रम मागे सोडत रोहितने गुरुवारी 264 धावांचे नवे ‘एव्हरेस्ट’ उभे केले. घणाघाती तरीही नैसर्गिक अभिजात शैलीत त्याने श्रीलंकन गोलंदाजांना तोड-तोड तोडले. एका खेळाडूने दोन द्विशतक ठोकण्याचा इतिहासही त्याने 8क् हजार कोलकातावासीयांच्या साक्षीने रचला. 
 
चित्त जेथो भॉयशून्य..
इडन गार्डनची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वाटचाल साजरी करणा:यांसाठी रोहित शर्माचे हे 173 चेंडूंचे पर्व अक्षरश: ‘भीषूण भालो’ होते. केवळ गुरुदेव टागोरांच्या शब्दांतच या तुफानाचे वर्णन होऊ शकते.. चित्त जेथो भॉयशून्य! (व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर)
 
द्विशतकवीर!
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतार्पयत द्विशतक ठोकणारे तीनही भारतीयच राहिले आहेत. त्यातही रोहितने दोन वेळा द्विशतक मारले आहे.
 
पहिले : सचिन तेंडुलकरने वन-डेत पहिले द्विशतक ठोकण्याचा मान पटकावला. ग्वालिअर वन-डेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 24 फेब्रुवारी 2क्1क् रोजी 147 चेंडूंत नाबाद 2क्क् धावा केल्या. 
 
दुसरे : वीरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2क्11 रोजी इंदौर येथे वेस्ट इंडिज विरुद्ध 149 चेंडूंचा सामना करत 219 धावांची खेळी करून सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला होता. 
 
तिसरे : रोहित शर्माने 2 नोव्हेंबर 2क्13 रोजी बंगळुरू वन-डेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत 2क्9 धावा चोपल्या होत्या. त्यासाठी त्याने 158 चेंडू खेळून काढत 12 चौकार व 16 षटकार खेचले होते.
 
दुखापतीतून सावरण्यासाठी विश्रंतीची संधी मिळाली. त्यामुळे थकवा जाणवत नाही. मी आणखी 5क् षटके फलंदाजी केली असती.  अर्धशतकाची वेस ओलांडल्यावर मोठी खेळी करण्याचा निर्धार केला. माङयासाठी हे ‘लकी’ मैदान आहे.
- रोहित शर्मा 
 
रोहितने आपल्याला आज जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवले.
- दिनेश लाड, 
रोहितचे प्रशिक्षक
 
रोहितची ही खेळी पाहता आली नाही. पण, ऑस्ट्रेलिया दौ:यापूर्वी आणखी एक द्विशतक हे आनंददायी सुचिन्ह आहे. 
- सचिन तेंडुलकर
 
हा विक्रम हुकला..
मुंबईच्या या फलंदाजाला लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या अॅलिस्टेयर ब्राऊनचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मागे सोडण्यात अपयश आले. ब्राऊनने 268 धावांची खेळी केली होती. ब्राऊनने र्सेविरुद्ध ग्लेमोर्गनविरुद्ध 2क्क्2मध्ये ओव्हल मैदानावर हा विक्रम नोंदविला होता. 
 
हा विक्रम केला..
रोहितने भारतातर्फे लिस्ट ‘ए’ सामन्यात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदविला. त्याने आज संघसहकारी शिखर धवनचा विक्रम मोडला. धवनने 12 ऑगस्ट 2क्13 रोजी भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध प्रिटोरियामध्ये 248 धावांची खेळी केली होती.   
 
मैदान व्यापले
यष्टिरक्षकाच्या बरोबर मागचा आणि पॉइंट व थर्डम्यानच्या मधील एक छोटा भाग सोडला तर हे अवघे मैदान व्यापून टाकणारे फटके.
 
 

 

Web Title: Smash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.