स्लिमानीची अल्जीरियाला सलामी
By Admin | Updated: June 28, 2014 00:17 IST2014-06-28T00:17:45+5:302014-06-28T00:17:45+5:30
अल्जीरियाने रशियाविरुद्धचा अंतिम साखळी सामना 1-1 असा बरोबरीत सोडवून फिफा विश्वचषकाची उप उपांत्यपूर्व फेरी गाठली.

स्लिमानीची अल्जीरियाला सलामी
>कुरितिबा : इस्लाम स्लिमानीने हेडरद्वारा नोंदविलेल्या गोलच्या बळावर अल्जीरियाने रशियाविरुद्धचा अंतिम साखळी सामना 1-1 असा बरोबरीत सोडवून फिफा विश्वचषकाची उप उपांत्यपूर्व फेरी गाठली. एच गटात बेल्जियम 9 गुणांसह अव्वल, तर अल्जीरिया 4 गुणांसह दुस:या स्थानावर राहिला. आता अल्जीरियाची गाठ पडेल ती जर्मनीविरुद्ध. अल्जीरियाने 1982 नंतर अंतिम सोळामध्ये प्रवेश केला.
रशियाला बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी विजयाची गरज होती आणि संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळही केला. सहाव्या मिनिटाला आघाडी घेत रशियाने पूर्वार्धात पकड घट्ट केली. दमित्री कोमबारोव्हच्या क्रॉसवर अलेक्झांडर कोकोरिन याने हेडरद्वारे गोल नोंदविला. स्लिामानीने त्यानंतर 6क् व्या मिनिटाला अल्जीरियाला बरोबरी गाठून दिली. रशियाचा गोलकिपर इगोर हा यासिर ब्राहिमीची फ्री किक थोपविण्यात अपयशी ठरला. त्यावर स्लिमानीने हेडरद्वारे गोल केला. रशियाकडून एकिनफिवची स्पर्धेत ही घोडचूक ठरली. टीव्ही रिप्लेमध्ये मात्र फ्रि किक अडविण्यापूर्वी गोलकिपरच्या चेह:यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट चमकत असल्याचे स्पष्टपणो दिसत होते.
ब्राहिमीने रशियाच्या बचाव फळीला फार त्रस दिला; पण नंतर कोचने त्याला बाहेर काढले. त्याने मिडफिल्डर सोफेन फेगोलीसोबत उत्तरार्धात रशियाला आक्रमक खेळण्यापासून रोखले. अल्जीरियाच्या गोलपूर्वी रशियाला आघाडी दुप्पट करण्याची संधी मिळाली होती. ओलेग शातोव्ह अल्जीरियाच्या मिडफिल्डरला चकवून पुढे गेला, पण त्याचा वेध चुकला. रशिया संघ 1986 पासून दुस:या फेरीत पोहोचू शकला नाही. त्या वेळी सोव्हिएट रशियाच्या नावाने संघ खेळायचा. अल्जीरिया याआधी 1982 मध्ये दुस:या फेरीनजीक पोहोचला होता; पण याच गटातील प. जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी आपापले सामने जिंकताच अल्जीरियाच्या आशा मावळल्या होत्या. अल्जीरियाने आपला अखेरचा साखळी सामना खेळल्यानंतर दुस:या दिवशी जर्मनी-ऑस्ट्रिया सामना झाला. प. जर्मनी 1-क् ने विजयी झाल्यास दोन्ही संघ बाद फेरी गाठतील हे सर्वश्रुत होते. झालेही तसेच. स्पर्धेच्या इतिहासात हा सर्वाधिक वादग्रस्त साखळी सामना समजला जातो. (वृत्तसंस्था)