दालमियांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा
By Admin | Updated: September 19, 2015 22:21 IST2015-09-19T22:21:01+5:302015-09-19T22:21:01+5:30
छातीतील दुखणे उमळल्यानंतर येथील स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर गुरुवारी पहाटे अँजिओग्राफी करण्यात आली.

दालमियांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा
कोलकाता : छातीतील दुखणे उमळल्यानंतर येथील स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यावर गुरुवारी पहाटे अँजिओग्राफी करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असून, आणखी ७२ तास
त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात येईल, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दालमिया हे अनेक महिन्यांपासून आजारी असल्याने बीसीसीआयच्या कामकाजातही सक्रिय दिसत नाहीत. गुरुवारी आयसीयूत दाखल करण्यात आल्यानंतर कोरोनरी अँजिओग्राफीपाठोपाठ त्यांच्या छातीत जमलेले रक्ताचे खडे काढून टाकण्यात आल्याची माहिती त्यांच्यावर
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी
दिली. (वृत्तसंस्था)