कर्णधारपद सोडणार नाही : अॅलेस्टर कूक

By Admin | Updated: September 4, 2014 01:48 IST2014-09-04T01:48:11+5:302014-09-04T01:48:11+5:30

भारताकडून सलग तीन एकदिवसीय सामन्यांत इंग्लंड पराभूत झाले तरी इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कूक याने आपण कर्णधारपद सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Skipper: Alastair Cook | कर्णधारपद सोडणार नाही : अॅलेस्टर कूक

कर्णधारपद सोडणार नाही : अॅलेस्टर कूक

बर्मिगहॅम : भारताकडून सलग तीन एकदिवसीय सामन्यांत इंग्लंड पराभूत झाले तरी इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कूक याने आपण कर्णधारपद सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इंग्लंड काल मंगळवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात नऊ गडय़ांनी पराभूत झाला होता. त्यामुळे इंग्लंड या मालिकेत क्-3 ने मागे आहे. कूकला कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘मी विश्वचषक स्पर्धेर्पयत या संघाच्या कर्णधारपदावर राहू इच्छित आहे. मात्र, संघनिवडीच्या प्रक्रियेत मी कोणताही हस्तक्षेप करीत नाही. ऑस्ट्रेलियातील विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीनेच मी तीन वर्षे कर्णधारपद सांभाळत आहे. मला माहीत आहे की, ही जरा लांबची गोष्ट आहे. मात्र, आमच्याकडे खरेच चांगले खेळाडू आहेत. त्यांच्यावर आम्हाला विश्वास ठेवायला हवा.’
कूक म्हणाला, ‘नऊ विकेटनी पराभूत होणो ही खरेच निराशाजनक गोष्ट आहे. आम्ही खूप वेगाने मागे पडलो आणि सामन्यात परतण्याची संधी मिळाली नाही. 
एकदिवसीय सामन्यात पुन्हा परतण्याची संधी मिळणो ही कठीण गोष्ट असते. कर्णधार म्हणून तुम्हाला माहीत असते की, क्रिझवर टिकून राहिले पाहिजे. मात्र विकेट पडत राहिल्या तर तुमच्या हाती काहीही राहत नाही.’ चुकीच्या रणनीतीमुळे पराभवाचा सामना करावा लागत असल्याच्या आरोपाचे त्याने खंडन केले. संघनिवड किंवा रणनीती पराभवाला कारणीभूत नसून खेळाडू ं चांगली कामगिरी करीत नाहीत; यामुळेच पराभव होत असल्याचे त्याने सांगितले. 
कूक म्हणाला, ‘आमचा संघ सर्वोत्कृष्ट नाही हे मला माहीत आहे; कारण आम्ही अजून चांगली कामगिरी करीत नाही. आमच्याकडे आता एकदिवसीय सामन्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी सहा महिने आहेत. आम्हाला आमची रणनीती बदलण्याची गरज नसून आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे,’ असेही कूक याने या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Skipper: Alastair Cook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.