एसजेएएन-रायसोनी अवॉर्ड
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30
जवागल श्रीनाथच्या हस्ते

एसजेएएन-रायसोनी अवॉर्ड
ज ागल श्रीनाथच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे आज वितरणनागपूर : स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे रायसोनी ग्रुपच्या प्रयोजनपदाखाली देण्यात येणाऱ्या एसजेएएन-रायसोनी अचिव्हर्स क्रीडा पुरस्कारांचे वितरण गुरुवारी सकाळी १० वाजता लक्ष्मीनगर आठरस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हे या सोहळ्याचे मुख्य पाहुणे असून, त्यांचे बेंगळुरू येथून सकाळी विमानाने नागपुरात आगमन होत आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी ग्रुपचे संचालक व्ही. गोपालकृष्णन राहतील. कार्यक्रमात क्रिकेटपटू अक्षय वखरे, व्हॉलिबॉल खेळाडू जयश्री ठाकरे, युवा बास्केटबॉलपटू यश गाईनकर, बुद्धिबळपटू मृदुल डेहनकर आणि प्रसिद्ध क्रीडा संघटक सत्तार अन्सारी यांच्यासह सरस्वती विद्यालय आणि काटोलच्या नबिरा महाविद्यालयाचादेखील रोख पुरस्कार आणि चषक देऊन श्रीनाथच्या हस्ते गौरव करण्यात येईल. बैद्यनाथ आयुर्वेद, म.गांधी हायस्कूल, सेंटर पॉईंट स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच देवेन दस्तुरे परिवार यांचे या आयोजनात सहकार्य लाभले आहे. क्रीडाप्रेमी आणि खेळाडू-पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन एसजेएएनने केले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)