अक्कलकोटच्या इंडियन मॉडेल स्कूलची सहाव्यांदा निवड
By Admin | Updated: October 4, 2014 22:54 IST2014-10-04T22:54:29+5:302014-10-04T22:54:29+5:30
अक्कलकोट: जिल्हास्तरीय शालेय 17 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या अक्कलकोटच्या इंडियन मॉडेल स्कूलची तालुक्यातून पुणे विभागीय हॉकी स्पर्धेसाठी सलग सहाव्यांदा निवड झाली़

अक्कलकोटच्या इंडियन मॉडेल स्कूलची सहाव्यांदा निवड
अ ्कलकोट: जिल्हास्तरीय शालेय 17 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या अक्कलकोटच्या इंडियन मॉडेल स्कूलची तालुक्यातून पुणे विभागीय हॉकी स्पर्धेसाठी सलग सहाव्यांदा निवड झाली़जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर संघाचा 3-0 ने पराभव केला़ या संघाला क्रीडाशिक्षक सतीशकुमार परदेशी, शासकीय क्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी, क्रीडा सहशिक्षक दयानंद दणुरे यांचे मार्गदर्शन लाभल़ेत्यांना संस्थाध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे, उपाध्यक्ष अमोल जोशी, सायली जोशी, ममता बसवंती, मुख्याध्यापिका शकीला खान, प्राचार्य डॉ़ जी़आऱ वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभल़ेविजयी संघ:कर्णधार महिबूब मुजावर, प्रवीण शिवशरण,चैतन्य दिवाण, फहीम पीरजादे, आकाश मुत्तगी, प्रथमेश राजगुरु, सर्मथ माशाळे, फहेद लोणी, सर्मथ होसुरे, अमित दणुरे, मनिष खुबा, अक्षय गद्दी, वैभव कोळी, शुभम सुरवस़ेफोटोओळी-पुणे विभागीय 17 वर्षांखालील शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या संघासोबत सतीशकुमार परदेशी, शकीला खान, दयानंद दणुऱे