सायनानं अव्वल स्थान गमावलं
By Admin | Updated: April 9, 2015 16:21 IST2015-04-09T16:21:11+5:302015-04-09T16:21:11+5:30
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची दुस-या स्थानावर घसरण झाली आहे.

सायनानं अव्वल स्थान गमावलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालची दुस-या स्थानावर घसरण झाली आहे.
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन(बीडब्ल्यूएफ )ने गुरुवारी महिला एकेरी खेळाडूंची नवीन क्रमवारीची यादी प्रसिध्द केली असून चीनची बॅडमिंटनपटू आणि ऑलम्पिक चॅम्पियन ली एक्सरुई अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. मागील आठवडयात अव्वल स्थानावर पोहोचलेली सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. परंतू इंडिया ओपन स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलीना मारीनकडून पराभूत स्वीकारावा लागल्यानंतर आणि सिंगापूर ओपन स्पर्धेतून माघार घेतल्याने सायनाचे गुणतालिकेतील गुण कमी झाले परीणामी सायनाची अव्वल स्थानावरुन दुस-या स्थानावर घसरण झाली. बीडब्ल्यूएफने प्रसिध्द केलेल्या क्रमवारीनुसार चीनची ली एक्सरुई ही ८०७६४ अंकांसह पहिल्या, भारताची सायना नेहवाल ८०१९१ अंकांसह दुस-या तर स्पेनची कॅरोलीना मारीन ७९५७८ अंकांसह तिस-या स्थानावर आहे. दरम्यान, पुरुष ऐकरीमध्ये भारताचा के. श्रीकांत हा चौथ्या स्थानावर असून पारुपली काश्यप १५ व्या स्थानावर आहे तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पा १८ व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत टॉप २५ मध्ये भारताच्या एकाही खेळाडूंचा समावेश नाही हे विशेष.