सिंधू, श्रीकांत तिसऱ्या फेरीत
By Admin | Updated: December 4, 2015 01:18 IST2015-12-04T01:18:38+5:302015-12-04T01:18:38+5:30
भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांनी इंडोनेशिया मास्टर्स ग्रां प्री गोल्ड स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. मागच्या आठवड्यात मकाऊ ओपन ग्रां प्री गोल्ड स्पर्धा

सिंधू, श्रीकांत तिसऱ्या फेरीत
मलांग : भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांनी इंडोनेशिया मास्टर्स ग्रां प्री गोल्ड स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. मागच्या आठवड्यात मकाऊ ओपन ग्रां प्री गोल्ड स्पर्धा जिंकणारी सिंधू हिने इंडोनेशियाच्या वुलान सी यू सुकुपुत्री हिला २१-१२, २१-९ अशा फरकाने नमविले. दोनदा विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सिंधू आता जांग मि ली व चीनचीच बिंगजियाओ यांच्यामधल्या विजयी खेळाडूविरुद्ध खेळणार आहे.
श्रीकांतने इंडोनेशियाच्या सापुत्रा विकी एंगावर २१-१४, १७-२१ व २५-२३ अशा फरकाने मात केली. आता तो चीनाच्या किआनो बिन विरुद्ध खेळणार आहे. भारताचा खेळाडू गुरुसाई दत्त याने सिंगापूरच्या कीन यू लो याला २१-१९, २१-१२ अशा फरकाने नमवून पुढच्या फेरीत प्रवेश केला.