शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू उपांत्य फेरीत

By admin | Updated: November 27, 2015 23:50 IST

फुलराणी सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताच्या विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधू हिने आपेक्षित कामगिरी करताना मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटाची उपांत्य फेरी गाठली.

मकाऊ : फुलराणी सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताच्या विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधू हिने आपेक्षित कामगिरी करताना मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटाची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष गटात मात्र भारताचे आव्हान संपुष्टात आले . बी. साई प्रणीत आणि एच. एस. प्रणय दोघांनाही अटीतटीच्या झालेल्या सामन्यात हार पत्करावी लागल्याने स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या सिंधूला उपांत्य फेरीत कूच करण्यासाठी कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. चीनच्या जागतिक क्रमवारीत ९१व्या स्थानी असलेल्या चेन युफेईने सिंधूला तीन सेटपर्यंत झुंजवले. पहिला सेट जिंकून सिंधूने आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर युफेईने चुरशीच्या झालेल्या खेळामध्ये अंतिम क्षणी खेळ उंचावताना दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारली आणि सामना १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर मात्र सिंधूने आक्रमक खेळ करताना युफेईला पुनरागमनाची एकही संधी न देता २१-१६, २१-२३, २१-१३ अशा विजयासह दिमाखात उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या बाजूला पुरुष गटात भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. १५व्या मानांकीत प्रणीतला मलेशियाच्या बिगरमानांकीत गोह सून हुआतने धक्का देताना सर्वांचे लक्ष वेधले. १ तास १० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात हुआतने प्रणीतला २१-१६, २१-२३, २१-१३ असा धक्का देत आगेकूच केली. त्याचप्रमाणे सातव्या मानांकीत प्रणयलाही धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या मानांकीत एहसान मुस्तफा विरुद्ध प्रणयला १८-२१, २१-१९, २१-११ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)