सिंधू दुसऱ्या फेरीत, पी. कश्यप बाहेर

By Admin | Updated: October 16, 2015 00:05 IST2015-10-16T00:05:17+5:302015-10-16T00:05:17+5:30

भारतीय खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने इंडोनेशियाची मारिया फेबे हिचा सलग गेममध्ये सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेची गुरुवारी दुसरी फेरी गाठली

Sindhu in second round, p. Kashyap is out | सिंधू दुसऱ्या फेरीत, पी. कश्यप बाहेर

सिंधू दुसऱ्या फेरीत, पी. कश्यप बाहेर

ओडेंसे : भारतीय खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने इंडोनेशियाची मारिया फेबे हिचा सलग गेममध्ये सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेची गुरुवारी दुसरी फेरी गाठली. आठवा मानांकित पारुपल्ली कश्यप हा मात्र पहिल्याच सामन्यात गारद झाला. एच. एस. प्रणय यालादेखील चायनीज तैपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले.
सिंधूने ३३ मिनिटांत सामना संपवीत फेबेवर २१-१३, २१-११ ने विजय साजरा केला. सिंधूला पुढील फेरीत चायनीज तैपेईची तिसरी मानांकित तेई ज्यू विग हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.
कश्यपला मलेशियाचा ली चोंग वेई याच्याकडून ४७ मिनिटांत १४-२१, १५-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. प्रणय हादेखील चायनीज तायपेईचा जेन हाओ याच्याकडून १ तास २१ मिनिटांत २३-२१, १९-२१, २१-१५ अशा फरकाने पराभूत झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sindhu in second round, p. Kashyap is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.