सिंधू दुसऱ्या फेरीत

By Admin | Updated: April 13, 2017 01:38 IST2017-04-13T01:38:11+5:302017-04-13T01:38:11+5:30

आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी. व्ही. सिंधूने आॅल इंग्लंड चॅम्पियन जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला नमवत सिंगापूर ओपन बॅडमिंटनमध्ये दुसरी फेरी गाठली.

Sindhu in second round | सिंधू दुसऱ्या फेरीत

सिंधू दुसऱ्या फेरीत

सिंगापूर : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी. व्ही. सिंधूने आॅल इंग्लंड चॅम्पियन जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला नमवत सिंगापूर ओपन बॅडमिंटनमध्ये दुसरी फेरी गाठली.
या महिन्याच्या प्रारंभी पहिली इंडिया ओपन सुपर सीरीजचे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत १०-२१, २१-१५, २२-२० असा विजय नोंदवला. आता ती इंडोनेशियाच्या फित्रियानी हिच्याविरुद्ध खेळेल. सय्यद मोदी ग्रांप्रीमधील उपविजेता बी. साई प्रणीतने डेन्मार्कच्या एमिल होस्टचा १७-२१, २१-७, २१-१९ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sindhu in second round